मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला रसिकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशीने 10 किलो वजन कमी केल्याचं समजतंय. आणि यासाठी त्याने जीमचा देखील वापर केला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याने कोणतं डायट फॉलो करुन एवढं वजन घटवलं याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं आहे. जेठालालचं मोठं फॅन फॉलोविंग आहे. जेठालालचं वजन काही दिवसांपूर्वी खूपच वाढलं होतं. वजन वाढल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.


स्वत: दिलीप जोशी यांनी सांगितलं होतं की, त्यांना रोजच्या बिझी शेड्युलमुळे फिटनेसकडे आणि शरीराकडे लक्ष देता येत नाही. त्यात जीमला जाण्यासाठी त्यांना वेगळा वेळ मिळणार नव्हता. मग त्यांनी स्ट्रीक्ट डायट फॉलो करत 10 किलोपर्यंत वजन कमी केलं.


वजन कमी झाल्यानंतरही त्यांनी आपलं डायट फॉलो केलं. दिलीप जोशी गुजराती असून ते शाकाहारी आहेत.