मुंबई : टीआरपीच्या यादीमध्ये 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा शो नेहमीच पहिल्या दहामध्ये असतो. शोमधील प्रत्येक पात्र आणि कलाकार हिट झाले आहेत आणि या टीव्ही शोने 3000 हून अधिक भाग पूर्ण केल्यानंतर अनेक विक्रम देखील मोडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोबद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी समोर आल्या असून, या शोबद्दल अधिक जाणून घेण्याची कायमच चाहत्यांची उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला या शो संबंधित काही तथ्य सांगणार आहोत जे तुम्हाला ठाऊक देखील नसतील. शोमध्ये जेठालालचे वडील चंपकलाल यांची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट सर्वांनाच माहित आहेत, पण खऱ्या आयुष्यातील चंपकलाल बद्दल तुम्हाला हे माहिती आहे का?


आता जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते ऐकुन तुम्ही गोंधळून जायची गरज नाही. शोमध्ये दाखवलेले चंपकलाल हे खऱ्या आयुष्यात व्यक्तिरेखेपेक्षाही खूप वेगळे आहेत हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे.


चंपकलाल यांना आहे हे व्यसन
शोच्या पटकथेनुसार चंपालाल म्हणजे जेठालाल यांचे वडील तापट स्वभावाचे दाखवण्यात आले आहेत आणि जे पाऊला-पाऊलावर संस्कारां विषयी बोलत असतात, तर नेहमी संस्कारांवर बोलणारे चंपकलाल चेन स्मोकर आहेत. 48 वर्षीय अमित भट्ट टीव्ही कार्यक्रम 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये चंपकलालची