मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. 2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही मालिका 13 वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमधील कलाकारांनी आपल्या भूमिकेने लोकांच्या मनात घर केलं आहे. शोमधील मुख्य व्यक्तिरेखाच नाही तर या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी तितकच प्रेम केलं आहे. आत्तापर्यंत या मालिकेमध्ये अनेक लोक आले आणि गेले, पण दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल अजूनही या मालिकेचा एक भाग आहेत. दिलीप जोशी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक मालिका केल्या, पण त्यांच्या करिअरला खरी उड्डाण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीदरम्यान दिलीप जोश यांनी या मालिकेबद्दलच्या अनेक अनोख्या गोष्टी सांगितल्या आहेत. 2008 मध्ये दिलीप जोशी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकाशी जोडले गेले होते. तेव्हापासून त्यांच्यावर प्रेक्षकांनी इतकं प्रेम केलं, ज्याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही.


इतक्या वर्षात मालिकेमध्ये बरेच लोक आले आणि गेले पण जेठालालची जागा कोणीच घेऊ शकले नाही. परंतु दिलीप जोशी एवढी वर्षे या मालिकेमध्ये राहण्याचे कारण काय? याबद्दल अनेकांना प्रश्न पडला आहे.


मालिकेसोबत इतकी वर्ष जोडले जाण्याबद्दल दिलीप जोशी म्हणाले, "या मालिकेचा भाग होण्यात एक मजा आहे. जोपर्यंत मला त्याचा आनंद घ्यायची संधी मिळत आहे, तोपर्यंत मी ते करत राहीन. ज्या दिवशी मला वाटेल की, मी ही मालिका एन्जॉय करत नाहीये. त्या दिवशी मी पुढे जाईन."


याविषयी पुढे बोलताना त्यांनी असेही सांगितले की, त्यांना अनेक शोजची ऑफर आली होती, मात्र त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला.


या मालिकेबद्दल बोलताना दिलीप जोशी म्हणतात की, 'ही मालिका चांगला चालतीय, तर का विनाकारण याला दुसऱ्या कारणासाठी सोडायचं'. अभिनेता म्हणतो की, या मालिकेमुळे त्यांना लोकांचे प्रेम मिळाले आहे, जे त्याला विनाकारण वाया घालवायचे नाही. या मालिकेशी आपले खास नाते असल्याचे दिलीप जोशी यांनी मुलाखतीत स्पष्ट केले आहे. त्यामुळेच त्याच्यासमोर मोठे कारण असल्याशिवाय ते हे शो सोडणार नाही.