मुंबई : यूएस प्लेन क्रॅशमध्ये टार्झन अभिनेता जो लारासह सात लोकांचं निधन झालं आहे. या अपघातात जो लारा यांच्या पत्नीचं देखील निधन झालं आहे. आरसीएफआर यांनी फेसबुकवर याबाबत माहिती दिली आहे. (Tarzan Actor Joe Lara Among 7 Presumed Dead In US Plane Crash)प्रायवेट जेट शनिवारी टेक ऑफ घेतल्यानंतर हा अपघात घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अपघात अमेरिकेतील टेनेसी येथे असलेल्या नदीत झालं आहे. लारा यांच्यासोबत सात जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. लारा यांनी नव्वदीच्या दशकात टीव्हीवरील मालिका 'टार्झन' मध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. रदरफोर्ड काऊंटीच्या 'फायर रेस्क्यू' कॅप्टन जॉन इंगलने याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की,'स्मिर्नाजवळ असलेल्या पर्सी प्रीस्ट नदीत शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.'



काऊंटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात लोकांची ओळख झालेली आहे. यामध्ये  ब्रँडन हन्ना, ग्वेन एस लारा, विलियम जे लारा, डेविड एल मार्टिन, जेनिफर जे मार्टिन, जेसिका वॉल्टर्स आणि जॉनाथन वाल्टर्स यांचा समावेश आहे. हे सगळे टेनेसी ब्रेटवुडचे निवासी आहेत. कुटुंबियांकडून याबाबत ओळख पटवून घेतली आहे. शनिवारी हे विमान दुपारी 11 वाजता आकाशात उडालं असेल. 'सेसना सी 501' विमान अपघात झाला आणि ते विमान प्रीस्ट नदीत कोसळलं.