पुष्पा सिनेमावर शिक्षकाने फळ्यावर लिहिली कविता, एकदा ही कविता वाचाच
पुष्पा हा सिनेमा कमर्शियल सिनेमा आहे. या सिनेमात हिंसक दृश्य मोठ्या प्रमाणात आहेत, पुष्पा हा एक रक्त चंदन लाकडाचा तस्कर दाखवण्यात आला आहे
मुंबई : पुष्पा हा सिनेमा कमर्शियल सिनेमा आहे. या सिनेमात हिंसक दृश्य मोठ्या प्रमाणात आहेत, पुष्पा हा एक रक्त चंदन लाकडाचा तस्कर दाखवण्यात आला आहे. तर पुष्पा हा काही आदर्श घेण्याचं पात्र नाही, असं शिक्षकांना म्हणायचं आहे, हा एक व्यावसायिक सिनेमा आहे, त्याच्याकडे व्यावसायिक सिनेमा, मनोरंजन यासारखंच पाहिलं पाहिजे, यातील वाईट वाटणाऱ्या गोष्टी ज्या नैतिकतेच्या चौकटीत बसत नाहीत. त्या तिथंच विसरल्या गेल्या पाहिजेत, असा हा संदेश आहे. शहीद भगतसिंह सारख्या लोकांचा हा देश आहे हे विसरु नये, अशी आठवण देखील त्यांनी करुन दिली आहे.
पुष्पा सिनेमातील पुष्कराज या युवकांचा आयकॉन न होता, याआधी महाराष्ट्रातही अनेक महापुरुष होवून गेले आहेत आणि ज्यांचे पराक्रम, कार्य, चरित्र आणि चारित्र्य हे काही काल्पनिक नाही. शिक्षकांनी लिहिलेली कविता वरील फळ्यावर तुम्हाला वाचता येईल.