Chhaava Movie : विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा बघायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, यानंतर या चित्रपटातील संभाजी महाराज यांच्या नृत्यामुळे हा चित्रपटाचा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात सापडला. विरोध होताच निर्मात्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या चित्रपटातील तो सीन कट करण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अशातच आता 'छावा' चित्रपटातील पहिल्या गाण्यांचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ए. आर. रहमान यांनी संगीत तर अरिजीत सिंग यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. 


'छावा' चित्रपटातील पहिलं गाणं 


विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटातील पाहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 'जाने तू'  या गाण्याची पहिली झलक आज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या गाण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्यामधील प्रेमळ नातं बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा टीझर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी देखील या गाण्याच्या टीझरवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटातील रश्मिका मंदाना आणि विकी कौशल यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. 'छावा' चित्रपटातील पहिलं संपूर्ण गाणं उद्या रिलीज होणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

'छावा' चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता


'छावा' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलर आणि पहिलं गाणं रिलीज झालं आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका मंदाना ही महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे तर चित्रपटातील संगीताची धुरा ही ए. आर. रहमान यांनी सांभाळली आहे.