मुंबई : कलाकार मंडळी बऱ्याचदा त्यांच्या डेली लाईफमधील हॅपी मुव्हमेंट चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. सेलिब्रिटींच्या नव्या लूकपासून ते स्टाईलिंग पर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा पाहायला मिळते. आपल्या लाडक्या कलाकाराची आवड-निवड जाणून घेण्यात फॅन्स नेहमीच उत्सुक असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मॉल स्क्रिनवरील सर्वांची लाडकी सुनबाई तेजश्री प्रधान देखील तिच्या प्रत्येक पोस्टमुळे चर्चेत असते. अग्गबाई सूनबाई या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन आता बरेच महिने उलटले आहेत. या मालिकेच्या दुसऱ्या भागात शुभ्राची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर साकारत आहे. त्यामुळे सध्या तेजश्री स्मॉल स्क्रिनपासून दूर आहे. 


अशाच ती सध्या काय करतेय हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाये.मालिका संपल्यानंतर तेजश्री सोशल मीडियापासून देखील काही काळ लांब होती. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगताना पाहायला मिळत होत्या, त्यानंतर पुन्हा 


एकदा तेजश्रीने सोशल मीडियावर कमबॅक केलं. त्यात आता तेजश्रीने एक न्यू हेअर लूकमधील फोटो पोस्ट केलाये.तेजश्रीने हा फोटो शेअर करत "...and thats called a perfect hair day" असं कॅप्शन दिलंय. तेजश्रीचा हा नवा लूक समोर येताच चाहत्यांनी तिला नव्या प्रोजेक्टसाठी हे  हेअर ट्रास्फॉर्मेशन केलं आहे का ? असा प्रश्न देखील करायला सुरुवात केलीय.


अग्गबाई सूनबाई या मालिकेनंतर आगामी कोणत्याही प्रोजेक्टबाबतची घोषणा तेजश्रीने अद्याप केलेली नाहीये. त्यामुळे येत्या काळात तेजश्रीचा कोणता अंदाज चाहत्यांना स्क्रिनवर पाहायला मिळतोय हे कळेलच.