तेजश्री प्रधान हा मराठी मालकांमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. तेजश्रीने आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काल केलं आहे.  सध्या तेजश्री प्रधान आपल्या नव्याने येऊ घातलेल्या सिनेमामुळे चर्चेत आहे. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे 'हॅशटॅग तदेव लग्नम' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाच्या निमित्ताने तेजश्रीने दिलेल्या मुलाखतीत आपल्या पहिल्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. तसेच या मुलाखतीत तेजश्री प्रधानने लिव्ह इन रिलेशनशिप आणि 25 ते 30 या वर्षांमध्ये मुली प्रेमात पडतात, यावरही भाष्य केलं आहे. 


मला लग्न करायचं होतं आणि ... 


मला लहानपणापासून आयुष्यात लग्न करायचंच होतं.लग्न करायचं आहे, याच मूडमध्ये होते मी, त्यामुळं मला पण २५ शीत लग्न करायचंच होतं, असं ती म्हणाली. मुलींना वयाच्या पंचविशीमध्ये खूप स्मार्ट दिसणारी किंवा ग्रुपची जान असणारी मुलं आवडतात. कारण ही मुलं फक्त स्वप्नाळू असतात. पण असं नसतं, तुम्हाला खऱ्या आयुष्यात स्थैर्य आणि खात्रक्षी देणारा मुलगा हवा असतो.  पुढे तेजश्री सांगते की, तिशीच्या आत लग्न करण्यासाठी मुलींवर प्रेशर असतं. कारण करिअर आणि लग्न यांवर लक्ष केंद्रीत करताना कुठेतरी उशिर होतो.  


तसेच आताची पिढी मॅट्रिमोनिअल साइटचा वापर डेटिंग ऍपसारखा करतात.. दोघांना एकट्याला कॉफी शॉपमध्ये का भेटायचं असतं. पण का? पहिली भेट ही पालकांसोबत होई दे काय फरक पडतो. लग्नापेक्षा लिव्ह इन बरं, असं मला कधीच वाटलं नव्हतं. तसंच जर तेजश्रीला वाटलं असतं तर आज तेजश्रीचं आयुष्य वेगळं असतं, असंही ती म्हणाली.आजकाल जे सिच्युएशनशीप वगैरे जे सुरू आहे ते खूप वाईट आहे, असंही ती म्हणाली. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.


मी आई आणि आजी यांना पाहत आलेय. त्यामुळे मला लहानपणापासूनच लग्न करायचं होतं. आणि ते लग्न मी वयाच्या पंचविशीत केलं ही. पण देवाला माझ्यासमोर काहीतरी वेगळे प्लान होते. 


जेन झी 


तेजश्री पुढे आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींबद्दल सांगत आहे. तेजश्री सांगते की, जेन झी ही संकल्पना अतिशय भयंकर आणि भीतीदायक वाटते. आपण रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅग बद्दल बोलायला लागलो आहे. बेन्चिंग आणि सिच्युएशनशिपमुळे काहीही फायदा होणार आहे.