Karan Kundrra आणि Tejasswi Prakash गुपचूप अडकले विवाह बंधनात?
करण आणि तेजस्वीच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होताचं सर्वत्र धुमाकूळ, दोघ खरंच अडकले विवाह बंधनात?
मुंबई : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा अनेक काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. 'बिग बॉस' शो दरम्यान झालेली त्यांची ओळख मैत्रीत बदलली. अखेर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. शो संपल्यानंतरही दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. चाहत्यांनी देखील या जोडीला डोक्यावर घेतलं आहे. त्यांच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहते भरभरून प्रेम देतात. अशात तेजस्वी आणि करणचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये करण आणि तेजस्वीने गुपचूप लग्न उरकल्याचं कळत आहे. सध्या करण आणि तेजस्वीच्या व्हायरल होत असलेल्या फोटोची तुफान चर्चा रंगत आहे. या फोटोला सोशल मीडियावरही खूप पसंती दिली जात आहे.
पण व्हायरल होत असलेला हा फोटो फेक असून चाहत्यांनी तो एडिट केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी करण आणि तेजस्वी यांनी लवकरात लवकर लग्न करावं... अशी इच्छा व्यक्त केली आहे. दोघांना चाहते तेजरन या नावानेही हाक मारतात.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी करणला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने अतिशय मजेशीर उत्तर दिले होते. करण कुंद्रा एका मुलाखतीदरम्यान म्हणाला होता की, आम्ही काहीही लपवत नाही. सध्या आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. लग्नाचा अद्यार विचार केलेला नाही.'
करण पुढे म्हणाला, 'लग्नासाठी मॅडमकडे वेळ कुठे आहे? आमच्यापेक्षा आमचे पालक एकमेकांना जास्त भेटतात. कामामुळे आम्ही मी भेटतो. पण आम्ही आमच्या रिलेशनशिपला पूर्ण वेळ देतो. सध्या आम्ही कामावर लक्ष केंद्रीत करत आहोत. त्यामुळे लग्नाचा अद्याप विचार नाही.'
तेजस्वीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या 'नागीन' मलिकेत दिसत आहे. तेजस्वी लवकरचं बॉलिडूनमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता आयुष्मान खुरानासोबत तेजस्वी 'ड्रिम गर्ल 2' सिनेमात दिसणार आहे.