हुश्श... अखेर करण- तेजस्वी लग्नबंधनात; पाहा पहिलावहिला व्हिडीओ
यांचं अखेर उरकलं... तेजस्वी - करणचं लग्न झालं? फोटो पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास...
मुंबई : टीव्ही विश्वातील सर्वात जास्त चर्चित कपल म्हणजे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा. दोघांबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायम उत्सुक असतात. आता देखील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे लग्नाच्या कपड्यांमध्ये दिसणार आहेत. त्यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर दोघांनी लग्न केलं असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
व्हिडीओमध्ये तेजस्वी नवरीच्या रुपात सुंदर, तर दुसरीकडे करण नवऱ्या मुलाच्या रुपात रुबाबदार दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघे सुंदर दिसत आहेत. सांगायचं झालं तर, तेजस्वी आणि करण 'बिग बॉस 15' च्या माध्यमातून चर्चेत आले.
'बिग बॉस'च्या घरात त्यांच्यात घट्ट मैत्री झाली, त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शोमध्ये करण आणि तेजस्वी या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. शो संपल्यानंतर करण-तेजस्वीच्या नात्याचा अंत होईल... असा अंदाज अनेकांनी वर्तवला. पण तसं काही झालं नाही.
करण आणि तेजस्वीमध्ये जे नातं आहे, ते दिवसागणिक अधिक घट्ट होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात येतं. नुकताच करण कंगना रानौतच्या 'लॉक अप' या रिअॅलिटी शोमध्ये जेलरच्या भूमिकेत आला होता.