मुंबई :  बिग बॉस विनर, प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) अनेक कारणांमुळे चर्चेत असते. बिग बॉसमधील करण कुंद्रासोबतच्या (karan kundra) तिच्या केमिस्ट्रीने जगाला तिचे फॅन बनवलं होते. ही केमिस्ट्री तिची बिग बॉसच्या बाहेर देखील दिसते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. सतत आनंदान राहणारी तेजस्वी प्रकाश बॉडी शेमिंगचाही (Body Shame) शिकार ठरली होती. याबाबतचा किस्सा तिने सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किस्सा काय?
तेजस्वीने (Tejasswi Prakash) एका मुलाखतीदरम्यान बॉडीशेमिंगचा किस्सा सांगितला आहे. या मुलाखतीत ती म्हणते की, ती शाळेत खूप पातळ होती. त्यामुळे वर्गमित्र तिला हॅंगरच्या नावाने चिडवायचे. त्यामुळे तिला बॉडीशेमिंग प्रचंड सामना करावा लागला होता. 


तेजस्वीने IDiva ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "मी शाळेत असताना खूप बारीक होते. सगळी मुलं मला हँगर म्हणायची. मी खूप हडकुळ होते. त्यामुळे जेव्हा कधी आम्ही शाळेच्या मैदानात खेळायचो तेव्हा सगळे मला म्हणायचे पाच रुपयांचे नाणे खिशात ठेवा नाहीतर उडून जाशील, असा किस्सा तिने सांगितला आहे.  


एंगेजमेंटची चर्चा 
दरम्यान नुकतचं तेजस्वीने  (Tejasswi Prakash) अंगठी फ्लॉंट करत एक फोटो पोस्ट केला होता. तेजस्वीने अंगठीसोबतचा आपला फोटो पोस्ट करताना लिहिले की, जेव्हा अंगठी इतकी चांगली असते, तेव्हा हा, ही अंगठी किती सुंदर आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना वाटले की, तिची करण कुंद्रासोबत एंगेजमेंट झाली आहे. यानंतर दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पण नंतर तेजस्वीने हे एका जाहिरातीसाठी फोटोशूट असल्याचे सांगत यावर स्पष्टीकरण दिले होते.