कॅमेऱ्यासमोर अभिनेत्रीची अशी झाली अवस्था..., काय करू समझेना; पाहा Video
अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तेजस्वी ही नेहमीच तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. एकीकडे तेजस्वीला सध्या अनेक ऑफर्स मिळत आहेत, तर दुसरीकडे, करण कुंद्रासोबतचे तिची लव्ह लाईफ सुद्धा चर्चेचा विषय ठरते. या कपलची केमिस्ट्री आणि बाँडिंग सगळ्यांनाच आवडते. या दोघांचे चाहते तर त्यांच्या लग्नाच्या तारखेची प्रतिक्षा करत आहेत. आता त्या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर हा प्रचंड व्हायरल झाला आहे.
तेजस्वीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत तेजस्वी सुंदर दिसत आहे. यावेळी तेजस्वीनं ब्रालेट टॉप परिधान केलं आहे. या रिव्हिलींग टॉपमुळे पापारांझींसमोर तेजस्वी अनकम्फर्टेबल असल्याचे दिसत आहे. तिचा व्हिडीओ शूट करण्यासाठी पापाराझी तिच्या मागे धावत आहेत आणि तेजस्वी तिचा ड्रेस सांभाळत त्यांच्यापासून लांब होत असल्याचे दिसत आहे.
करण कुंद्रा आणि तेजस्वीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तेजस्वीची ही स्टाईल पहिल्यांदाच चाहत्यांच्या समोर आली नाही, तर दररोज तेजस्वी आणि करणची अधिक बोल्ड आणि रोमँटिक स्टाइल पाहायला मिळतात.
करण आणि तेजस्वी ही जोडी चाहत्यांना खूप आवडते, तर आता सर्वांना त्यांच्या लग्नाचीही प्रतीक्षा आहे. करणला नवरा आणि तेजस्वीला नवरी बनताना पाहण्यासाठी त्याचे चाहते अधीर झाले आहेत आणि विशेष म्हणजे करणने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. लग्नाच्या प्रश्नावर करण कुंद्रानं सांगितलं की, सर्व काही ठीक आहे, त्यामुळे लग्न लवकर झालं पाहिजं. त्याच्या मते हे नातं चांगलं चाललं आहे. अशा परिस्थितीत तो लवकरच लग्न करेल अशी आशा त्यानं दिली आहे.