मुंबई : 'बिग बॉस 15' च्या विजेती तेजस्वी प्रकाशने रातोरात प्रसिद्धी मिळवली आहे. आपल्या जबरस्त अंदाजाने तिने लोकांना आपल्या प्रेमात पाडलं. तेजस्वी प्रकाशने बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यापासूनच तिच्या करण कुंद्रोसोबतच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. करण कुंद्रासोबतची तिची वाढती जवळीक लोकांचे लक्ष वेधून घेत होती. आजही चाहत्यांना तेजस्वी आणि करण यांना एकत्र पाहायला आवडते. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा लेटेस्ट व्हिडिओ पाहता, तेजरणची जोडी एकमेकांच्या प्रेमात बुडलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये करण आणि तेजस्वी लिपलॉक करताना दिसत आहेत. 


त्यानंतर अचानक तेजस्वी प्रकाशची मैत्रिण त्यांचा व्हिडीओ बनवताना दिसते. व्हिडीओ पाहून तेजस्वी काही क्षणासाठी घाबरते. पण नंतर ती आनंदी होते. एवढंच नाही तर, व्हिडीओसाठी तेजस्वी तिच्या मैत्रिणीचे आभार देखील मानताना दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या रोमँटिक क्षणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. तेजरनचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडतोय. 


करण (करण कुंद्रा) आणि तेजस्वी यांच्यात असलेल्या प्रेमाचा अंदाज तुम्ही व्हिडीओ पाहून लाऊ शकता. करण आणि तेजस्वीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय चाहते देखील दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात.