`...घरात `लक्ष्मी` आली`; तेजस्विनी पंडितनं चाहत्यांसोबत शेअर केली Good News
Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितनं पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी...
Tejaswini Pandit : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘येक नंबर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला असून एक वेगळी पटकथा जी कधी कोणी पाहिली नसेल असं काही प्रेक्षकांना पाहायला मिळालं. या चित्रपटातून तेजस्विनी फक्त एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांना भेटली नाही तर त्यासोबत तिनं या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. एकीकडे चित्रपटाची चर्चा तर दुसरीकडे तेजस्विनीनं शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. तेजस्विनीनं पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
तेजस्विनीनं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तेजस्विनीनं नुकत्याच जन्माला आलेल्या बाळानं हात पकडल्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तेजस्विनीनं तिच्या घरी लक्ष्मीचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे. "माझ्यासाठीची सगळ्यात ‘मोठी’, सगळ्यात ‘खास’ आणि आयुष्यभराची ‘दिवाळी भेट’ माझ्या बहिणीनं आणि दाजींनी मला दिली आहे. आमच्या घरात ‘लक्ष्मी’ आली! अनेक वर्ष या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो. माझ्या माणसांच्या आयुष्यातला 14 वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला. त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या, तिथली धावपळ, अचानक उद्भवलेले अडथळे या सगळ्यात आजूबाजूला सणाचे वातावरण आहे हे विसरायला झालं होतं, पण या सगळ्यावर मात करत आमचे दिवाळीचे क्षणच नव्हे तर आयुष्य देखील या ‘कन्यारत्नाने’ उजळून टाकले! आमच्या कुटुंबाची 'कथा' सुफळ संपूर्ण म्हणुया? ही दिवाळी माझ्यासाठी एकदम खास आहे, मी मावशी झालेय! होऊ दे खर्च. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा! शुभ दीपावली! शुभं भवतु", असं कॅपशन तेजस्विनीनं दिलं आहे.
तेजस्विनीनं ही पोस्ट दिवाळीच्या निमित्तानं शेअर केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोशल मीडियावर तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला सगळे शुभेच्छा देत आहेत. यात फक्त तिचे चाहते नाही तर त्यासोबत सेलिब्रिटींनी देखील तिच्या पोस्टवर कमेंट करत तेजस्विनी, तिची बहिण पूर्णिमा आणि विनीतला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात आनंदी जोशी, तितिक्षा तावडे, सुखदा खांडेकर, अभिजीत खांडेकर, नम्रता संभेराव, सायली पाटील, मृणाल दुसानिस, श्रेया बुगडे, सावनी रविंद्र, स्वप्नील जोशी, धैर्य घोलप, नागेश भोसले या कलाकारांसोबत आणखी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.