मुंबई : टेलिव्हिजन अभिनेता रवी दुबे हा कायमच त्याच्या मनमिळाऊ स्वभावासाठी चाहत्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी राहिला आहे. हॅण्डसम रवीच्या फिमेल फॅन्सचा आकडाही तसा मोठाच आहे. पण, आता हाच अभिनेता ज्या रुपात सर्वांसमोर आला आहे, ते पाहून मात्र सर्वांनाच भयंकर चिंता सतावू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवीसोबत हे काय आणि नेमकं कसं घडलं असाच प्रश्न चाहत्यांना पडत आहे. 


रवीला अशा अवस्थेत याआधी कधीच पाहिलं नसल्यामुळे चाहत्यांच्या मनात काहूर माजला आहे. त्याचा फोटो पाहून अंहावनर काटाच उभा राहत आहे. 


सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रवीनं नुकताच त्याचा एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून चाहते घाबरले आहेत. 


रवीच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत. त्याच्या डोळ्याच्या इथे जबर दुखापतही झाल्याचं दिसत आहे. 


चेहऱ्याच्या एका बाजूची अवस्था नेमकी का आणि कशी झाली, हेच तुम्हीही विचाराल असाच रवीचा हा फोटो आहे. 



टेलिव्हिजन अभिनेत्याचा हा फोटो त्याच्या वेब सीरिजसाठी आहे. 'मत्स्य कांड' असं या वेब सीरिजचं नाव. या वेब सीरिजसाठी त्याची कमालीची प्रशंसाही केली जात आहे.