Shaheer Sheikh: टेलिव्हिजनवरचे हिरो हिरोईन आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. मालिकांमध्ये समोर येणारी त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अनेकदा किशोरवयीन कॉलेज तरूण तरूणींच्या गोसिंपींगमध्ये हिरो हिरोईनच्या केमेस्ट्रीची आणि सौंदर्यांची विशेष चर्चाही रंगते. त्यातून ते त्यांच्या पर्सनल लाईफसाठीही ओळखले जातात. टेलिव्हिजनवरील रिल कपल्सप्रमाणे रिअल कपल्सही चर्चेत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातलंच एक जोडपं आहे ते म्हणजे शाहीर शेख आणि रूचिता कपूर. शाहीर शेख हा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय स्टार आहे. त्याने 'महाभारत', 'नव्या', 'क्या मस्त है लाइफ' आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. शाहीर शेख त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या गुड लुक्ससाठीही ओळखला जातो. त्यामुळे लाखो मुली त्याच्या लुक्सवर फिदा असतात.


त्याच्या आयुष्यातील त्याची धडकन म्हणजे त्याची पत्नी रुचिका कपूर. दोघांची केमिस्ट्री त्याच्या चाहत्यांना खूप आवडते. 


शाहीर शेखने अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पत्नी रुचिका कपूरसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ते त्यांचा रॉमेण्टिक टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या मागे बॅकराऊंडला 'कम थ्रू' आणि 'बारिशों में' ही गाणी वाजत आहेत. या व्हिडीओतून ते दोघं लिप लॉक शेअर करताना दिसत आहेत. 


शाहीर शेख आणि रुचिका कपूरचा हा रोमँटिक व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतोय. त्यांच्या या व्हिडीओ इंडस्ट्रीतील स्टार्सनीही कमेंट्स केल्या आहेत. त्याचसोबत त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शाहीर शेख आणि रुचिका कपूर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. 2021 मध्ये दोघांना अनया नावाची एक गोडंस मुलगी झाली आहे.