मुंबई: 'पर्मनंट रुममेट्स', 'ट्रिपलिंग' आणि अशा अनेक वेब सीरिजमधून झळकलेल्या अभिनेता सुमीत व्यास यानं आणि त्याच्या पत्नीनं कुटुंबातील एक गोड बातमी सर्वांच्या भेटीला आणली आहे.  सुमीत आणि त्याची पत्नी अभिनेत्री एकता कौल या़ंच्या कुटुंबाचा त्रिकोण आता पूर्ण झाला आहे. कारण, एकतानं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सुमीतनेच एक सोशल मीडिया पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलगा झाला आहे..... असं सांगत त्यानं मुलाचं नावही त्यानं जाहीर केलं. एकता कौल आणि सुमीत व्या‌स या‌ सेलिब्रिटी जोडीचा मुलगा 'वेद' या नावानं ओळखला जाईल. कोरोना व्हायरस,‌ निसर्ग चक्रीवादळ अशाच बाबतीतील वृत्तंं काना़वर येत असतानाच  सुमीतच्या ‌कुटुंबात झालेली आनंदाची ही उधळण अनेकांच्याच चेह-्यावर हसू आणत आहे. कित्येक चाहत्यांनी या सेलिब्रिटी जोडीला शुभेच्छा देत वेदचं अगदी आपलेपणानं स्वागत केलं.


काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सुमीत आणि एकतानं विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. एकताचं आणि त्याचं नातं हे अनेक चाहत्यांनाही #couplegoals देणारं ठरलं. मुख्य म्हणजे सध्याच्या घडीला चाहतेही त्याच्या या आनंदात सहभागी होत आहेत, कारण एकताला बाळाची चाहूल लागला पासून ग तिचं गरोदरपण आणि मातृत्त्वापर्यंतच्या प्रवासात त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून या चाहत्या़ंनाही सहभागी करुन घेतली होतं.