मुंबई : विकी जैन याच्यासोबत लग्न करत अंकिता लोखंडे हिनं वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. अतिशय खास अंदाजात आणि मोठ्या थाटात तिनं लग्नगाठ बांधली. यावेळी कला जगतातील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी तिच्या लग्नाला हजेरी लावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिताच्या लग्नातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. कुठे ती मेहंदीचे क्षण Enjoy करताना तर कुठे विकीकडे प्रेमानं पाहताना दिसत आहे. 


इतकंच नव्हे, जेवणाच्या टेबलवर पुढ्यात पान वाढलेलं असताना चक्क बेभान डान्स करतानाही ती दिसत आहे. 


एका व्हायरल व्हिडीओमध्ये अंकिता जेवताजेवताच डान्स करण्यास सुरुवात करताना दिसते. बरं, तिचा डान्सही असा की थांबवणं अशक्यच. 


अंकाताचा विवाहसमारंभातील हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडीओ सर्वांच्याच पसंतीस पडतोय असं नाही. 


काही नेटकऱ्यांनी तिला रागे भरत भानावर ये, किती ही ओव्हरअॅक्टिंग अशा शब्दांत खडे बोल सुनावले आहेत. 




अंकिता उत्साही आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण, तिचा हा अतिउत्साहीपणा मात्र सर्वांनाच रुचेल असं नाही. जे आता या व्हिडीओला आलेल्या कमेंटवरुन स्पष्ट होत आहे.