मुंबई : टेलिव्हीजन अभिनेत्री देबिना बनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी या दोघांच्याही वैवाहिक नात्यात काही महिन्यांपूर्वी एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. तिच्या येण्यानं त्यांच्या कुटुंबात हर्षोल्हासाचं वातावरण निर्माण झालं. लेकिच्या जन्माला चार महिने पूर्ण झाले आणि लगेचच गुरमीत- देबिनानं पुन्हा एकदा त्यांच्या या कुटुंबाचा चौकोन पूर्ण करण्यासाठी आणखी एका बाळाची चाहूल लागल्याची गोड बातमी दिली. (television Actress Debina Bonnerjee on Second Time pregnancy Within 4 Months after first child birth)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देबिनानं इतक्या लवकर दुसऱ्या बाळाचा निर्णय घेतला, हे वाचून या सेलिब्रिटी जोडीच्या चाहत्यांना धक्काच बसला. काहींनी त्यांच्या या अत्यंत खासगी निर्णयाची खिल्लीही उडवली. 


देबिना बनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत 2011 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. लग्नाला 11 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या जोडीनं त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. IVF च्या माध्यमातून देबिना आई झाली. ज्यानंतर पुन्हा एकदा आपण गरोदर असल्याचं तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितलं. 


यावेळी मात्र नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. 'दुसऱ्या बाळाचा विचार करण्यापूर्वी तू पहिल्या बाळाला काही वेळ द्यायला हवा होतास.. असो पण तरीही तुला शुभेच्छा' असं म्हणत काहींनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रतिक्रियांवर व्यक्त होत देबिना म्हणाली, 'जुळी मुलं झाल्यास काय करता?', दुसरं गरोदरपण म्हणजे एक चमत्कार, असं म्हणताना आता हे बाळ पाडू का? असा उपरोधिक प्रश्नही तिनं विचारला. 



मुळात सेलिब्रिटी असो किंवा आणखी कोणी. इतरांच्या खासगी आयुष्यातील घडामोडी आणि निर्णय पाहता त्यावर आक्षेपार्ह, नकारात्मक प्रतिक्रिया देण्याचा हक्क, नेटकऱ्यांना, तुम्हाला-आम्हाला कोणी दिला? आपण मर्यादा विसरतोय का? हाच प्रश्न उभा राहत आहे.