Television Actress Dipika Kakar Controversies : घटस्फोट, इस्लामचा स्वीकार..; दिपिकाचं नेमकं काय सुरुये?
Entertainment News : दिपिकाच्या वाट्याला लोकप्रियता तर आली. पण, भूतकाळानं मात्र अभिनेत्रीची पाठ सोडलेली नाही. दुसरं लग्न करतेवेळी तिनं पहिल्या पतीला बॉयफ्रेंडवरील प्रेमापोटी सोडलं अशाची चर्चांना वाव मिळाला..
Television Actress Dipika Kakar Controvercies : सहसा टेलिव्हिजन अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचं प्रमाण कमीच असतं. पण, इथंही काही नावं अशी आहेत जी सातत्यानं या न त्या कारणानं प्रकाशझोतात येत असतात. त्याच यादीत एका अशा अभिनेत्रीचाही समावेश आहे, जिचं नाव बऱ्याच वादांमध्ये गोवलं गेलं. अनेकांनी तिच्या खासगी आयुष्यावरही टीका केली. धर्मापासून ते अगदी तिच्या नावापर्यंत अनेक गोष्टींवर चाहत्यांनी आक्षेप घेतला. प्रकरण इतकं वाढलं की अभिनेत्रीच्या पतीलाही नेटकऱ्यांनी सोडलं नाही. ही अभिनेत्री म्हणजे दिपिका.
दिपिकाचं हे दुसरं लग्न, तिनं या लग्नासाठी इस्लामचाही स्वीकार केला. किंबहुना बऱ्याच वर्षांपूर्वी तिनं पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. तुम्हाला वाटेल दीपिका पदुकोणनं इतकं सगळं केलंय? तर तसं नाहीये. ही दिपिका म्हणजे ‘ससुराल सिमर का’ (Sasural Simar ka) फेम अभिनेत्री दिपिका कक्कर (Dipika Kakar ).
एअरहॉस्टेस ते अभिनेत्री... Boyfrirnd साठी पतीपासून दुरावा
दिपिका कक्कर कलाजगतात येण्याआधी ती एअरहॉस्टेस होती. पण, या क्षेत्रातून अभिनय जगतात येत तिनं एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. ज्या मालिकेनं तिला लोकप्रियता दिली, त्यातच तिनं शोएब इब्राहिम (Shohaib ibrahim) या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर केली आणि तिथंच त्यांच्या प्रेमाचीही सुरुवात झाली. पुढे तिनं त्याच्याशी लग्नही केलं.
फार क्वचितच चाहत्यांना माहितीये की दिपिकाचं हे दुसरं लग्न. अभिनय विश्वात येण्याआधी ती विवाहित होती. रौनक मेहता असं तिच्या पहिल्या पतीचं नाव. तो एक वैमानिक असल्याची माहिती समोर आली. दिपिका आणि रौनक यांचं नातं फार काळ टिकलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार शोएबमुळं दिपिका आणि आपलं नातं तुटलं असं रौनक म्हणाला होता (Dipika kakar Shohaib ibrahim wedding).
हेसुद्धा पाहा : किती लपवणार? Viral VIDEO मुळे Anushka - Virat च्या लेकीचा चेहरा पुन्हा सर्वांसमोर
(Dipika kakar islam) दिपिकानं खासगी आयुष्यात एका नव्या नात्याची सुरुवात केली असली तरीही तिच्या या नात्यामध्ये भूतकाळानं काही पाठ सोडली नव्हती. त्यातही तिनं शोएबशी लग्न करण्याआधी इस्लाम स्वीकारला आणि त्यामुळंही काही चाहत्यांची निराशा झाली. ज्या क्षणी दिपिकानं इस्लाम स्वीकारला त्या क्षणापासून या धर्मानुसार फैजा शोएब इब्राहिम ही तिची नवी ओळख समोर आली. आजच्या घडीला ती युट्यूबवर ((Dipika kakar you tube channel) बऱ्यापैकी सक्रिय आहे. पण, अनेकदा तिच्या वागण्याबोलण्यातून मुस्लिम धर्माच्या चालिरिती आणि परंपरा पार पाडल्या जाताना पाहून काही चाहते मात्र निराशेचा सूर आळवतात.