मराठमोळ्या लावणीवर दीपिकानं धरला ठेका... Video पाहून नेटकरी बेभान
तेव्हा सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे.
Deepika Singh Goyal Dance Video: गेल्या दोन दिवसांपासून सगळीकडेच गणेशोत्सावाचा उत्साह आहे. सर्वच जण अगदी थाटामाटात गणपती बाप्पाची पूजा करतायत. सगळ्यांच्या घरी मोदकांचा प्रसाद होतोय. साग्रसंगीत जेवणाचा दरवळ पसरलाय आणि घरात आकर्षक सजावटही झाली आहे. तेव्हा सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. (television actress dipika singh lavani dance goes viral on social media see video)
कालपासून देशभरात गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2022) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून तारे-तारकांपर्यंत सर्व गणेश भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सर्वत्र ऐकू येत आहे.
बॉलीवूडप्रमाणेच हिंदी टेलिव्हिजनवरील सेलिब्रेटीच्या घरीही गणेशोत्सवाचे आगमन झाले आहे. त्याचबरोबर सगळेच सेलिब्रेटीही हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी खूप उत्साही आहेत.
सेलिब्रेटींचा उत्साह बघता सगळ्यांनीच सोशल मीडियाला जवळ केले आहे. अशाच एका अभिनेत्रीनं तिचा असाच एका डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका सिंग गोयल हिने तिचा एक नवा डान्स व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती लावणी करताना दिसते आहे.
टीव्ही स्टार दीपिका सिंग (Deepika Singh Goyal) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 'दिया और बाती हम' (Diya Aur Bati Hum) फेम अभिनेत्रीनं तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. केशरी रंगाची नऊवारी साडी घालून तिनं 'लावणी' करत आहे. अभिनेत्रीचा हा डान्स व्हिडिओ सर्वत्र गाजत आहे.
डान्स करताना दीपिका सिंगने खास पद्धतीने चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपिका सिंह टीव्ही सीरियल 'दिया और बाती हम'मध्ये दिसली होती. या टीव्ही शोने अभिनेत्रीला रातोरात स्टार बनवले. या मालिकेत तिने संध्याची भूमिका साकारली होती. आजही चाहते त्यांना त्यांच्या खऱ्या नावाऐवजी 'संध्या' या नावानेच ओळखतात.
अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने 'दिया और बाती हम' शोनंतर लग्न केले. दीपिकाही एका मुलाची आई आहे. लग्न आणि मुलांनंतर दीपिकाने दीर्घ ब्रेक घेतला. मात्र, यादरम्यान दीपिका 'कवच' या टीव्ही शोमध्ये दिसली. हा शो काही विशेष करू शकला नाही.