Nia Sharma Dold Dress: बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये बोल्डनेसची आता कमतरता नाही परंतु नुकत्याच एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने रक्षाबंधन साजरी करताना बोल्ड ड्रेस घातल्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते आहे. रक्षाबंधन असो किंवा कुठलाही सण, त्यादिवशी पारंपरिक कपड्यांनी मुली नटताना मुरडताना दिसतात. सणासुदीला स्त्रिया भारतीय पोशाख परिधान करतात. परंतु या अभिनेत्रीने राखी बांधताना घातलेला बोल्ड ड्रेस अनेकांना रूचलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्माने नुकताच इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती गुलाबी लो नेक वनपीस घालून रक्षाबंधन साजरी करण्यासाठी दिग्दर्शक - निर्माते सिद्धार्थ मल्होत्रा यांना राखी बांधायला गेली होती. नियाने राखी बांधता इतका बोल्ड ड्रेस घातल्यामुळे चाहते तिच्यावर नाराज झाले. त्यामुळे तिचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. 


या फोटोत नियाच्या ड्रेसला पाहून अनेकांनी ट्रोल केले आहे. तिचा हा ड्रेस ब्रलेस आहे. फोटोमध्ये निया तिचा भाऊ सिद्धार्थ मल्होत्रा ​​याला राखी बांधताना दिसत आहे. फ्रंट साइड राउंड कट अशी या ड्रेसची फॅशन आहे. हा तिचा ड्रेस रिव्हिलिंग लूकमध्ये आहे. या फोटोखाली नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत तर तिच्या पुष्कळ चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षावही केला आहे. 



सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तर निया शर्मा ही सुप्रसिद्ध हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री असून तिने बऱ्याच हिंदी रिएलिटी शोमधून काम केले आहे.