मुंबई :  जीवनाच्या प्रत्येक वळणावर काही अशा गोष्टी घडतात ज्यामुळे आयुष्य पुरतं बदलून जातं. एखादी व्यक्ती, एखादी घटना अशा अनेक गोष्टी त्यासाठी निमित्तमात्र ठरतात. असाच बदल झाला कलाविश्वात सक्रिय असणाऱ्या एका खऱ्याखुऱ्या राजकुमारीच्या जीवनात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नृत्यकला, अभिनय अशा क्षेत्रांमध्ये सक्रिय असणारी ही राजकुमारी आता कलाविश्वापासून दूर तिच्या खासगी आयुष्याची जबाबदारी अतिशय सुरेखपणे सांभाळत आहे. ही राजकुमारी, म्हणजेच ही अभिनेत्री आहे, रेवाची राजकुमारी मोहिना कुमारी सिंह. 


परिकथा, राजकुमारी, राजपुत्र, राजेशाही थाटातील विवाहसोहळा हे सारंकाही स्वप्नवत वाटणारं मोहिनाने खऱ्या जीवनात अनुभवलं. सहा महिन्यांपूर्वी तिने सुयश रावत याच्याशी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या याच सुखावह प्रवासाला सहा महिने पूर्ण होण्याच्या निमित्ताने मोहिनाने सोशल मीडियायवर तिच्या शानदार विवाहसोहळ्याचे काही खास क्षण सर्वांच्या भेटीला आणले आहेत. 


 

 

 

 



Six months ago was literally the biggest day of my life...a day full of nervousness, laughter , hugs & tears a lot of things changed, a lot of new things began. My family did so much for me and my happiness and gave me so much love.I will never be able to thank them enough. My new family supported me and took me in with so much love that I will be indebted with love for life. Thanks to all my friends who made it for my big day , I literally couldn’t do it without you’ll, love you guys so much. All our staff - my extended family- that was there working tirelessly day in and day out to make these days and this day especially , so wonderful for us.A big thank you to all the Premi’s of Manav Dharam @manavdharam who came from all over the world to celebrate our day with us thank you for all the love. And now for the one and only , the one who has been my pillar , my buddy , my partner in crimes and good deeds @suyeshrawat, my love, my everything. Thank you for sharing and cherishing the best moment of my life. I love you My Pati. So much #happysixmonths #sumo #sumokishaadi Thanks for the Lovely Teaser @storiesbyjosephradhik Eagerly waiting for The Wedding Film 

A post shared by Mohena Kumari Singh (@mohenakumari) on


तिच्या आणि सुयशच्या विवाहसोहळ्यातील क्षणांची ही लहानशी झलक पाहता, लगेचच एका वेगळ्या विश्वात गेल्याचा भास होतो. भावभावना, आनंद, एकमेकांना साथ देण्याचा निस्वार्थ हेतू, या क्षणाची साक्ष पाहणारे हजारो लोक असं एकंदर चित्र मोहिनाच्या लग्नाच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. गुंतवून ठेवणाऱ्या या अवघ्या काही मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दिसणारा राजेशाही थाट पाहून तर डोळे दीपत आहेत. मुख्य म्हणजे मोहिना आणि सुयशच्या लग्नसोहळ्याला तिच्या या चाहत्यांनी उपस्थिती नव्हती, त्यांनाही या क्षणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे.