मुंबई : नात्यांच्या गुंतागुंतीमध्ये अनेकदा काही व्यक्ती अशा काही गुरफटल्या जातात की नात्यांमध्ये निर्माण होणारी तेढ काही केल्या सुटत नाही. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई, हिनेसुद्धा अशाच प्रसंगांचा सामना केला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराविषयी म्हणजे एक्स बॉयफ्रेंडविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बिग बॉस १३' या रिऍलिटी शोमुळे चर्चेत असणाऱ्या आणि या कार्यक्रमाची अंतिम फेरी गाठणाऱ्या रश्मीने 'टाईम्स ऑफ इंडिया'शी संवाद साधताना याविषयीची माहिती समोर आणली. दिवाळखोरीपासून मला वाचवल्याचं तो जे काही म्हणत आहे, हे काही अंशी विनोदी असल्याचं रश्मी म्हणाली. 


'कार्यक्रमादरम्यान, त्याने मला रस्त्यावरु परत आणल्याचं सांगितलं. हे जरा विनोदीच आहे. अर्थात एक काळ असा होता की माझ्याकडे आर्थिक चणचण होती', असं म्हणत रश्मीने वस्तुस्थिती सर्वांपुढे ठेवली. अरहान हा विषयच आपल्यासाठी आता संपल्याचं तिने स्पष्ट केलं. पण, नात्यांची अखेरची गणितं स्पष्ट करण्यासाठी आपण त्याना भेटणार असल्याचा दावाही तिने केला. 


'त्याने मेसेज करत माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मीसुद्धा काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्याला भेटेन. मला त्याच्या लग्न आणि मुलाविषयी मात्र काही माहित नाही', असं म्हणत त्याच्या आईवडिलांना आपण कधीच भेटलो नसल्याचं रश्मी म्हणाली. शिवाय अरहानच्या मुंबईतील घरांविषयीही आपल्यावा काहीच कल्पना नसल्याचं तिने सांगितलं. 




अरहानच्या करिअरला चालना मिळावी यासाठी तिने 'बिग बॉस १३' या कार्यक्रमाचा प्रस्ताव स्वीकारला. पणस त्याने आपला भावनिक वापर केल्याचं ती म्हणाली. आपल्याला या मुदद्यापलीकडे आणखी काही बोलायचं नसल्याचं म्हणत रश्मीने खासगी आयुष्यातील या वाईट प्रसंगाविषयी बोलणं थांबवलं. अरहानशी असलेल्या नात्यात थांबण्याचा निर्णय घेणं सोपं नसल्याचंही तिने सांगितलं.