Television Actress Shares Good News With Fans: साथ निभाना साथिया ही मालिका दहा वर्षांपुर्वी प्रचंड गाजली होती. आताही या मालिकेची जादू काही केल्या कमी झाली नाही. लॉकडाऊनमध्ये रसोडे में कौन था या गाण्याचा मीमही व्हायरल झालेला तुम्ही पाहिला असेलच. त्यानंतर या मालिकेला एक वेगळीच लोकप्रियता मिळाली. त्यातून आता या मालिकेचा दुसरा सिझन स्टार प्लस ऑन एअर सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेतील राशी ही खलभुमिका विशेष गाजली. त्यामुळे राशी ही व्यक्तिरेखा साकारणारी ऋचा हसबनीस ही अभिनेत्रीही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. ऋचाचं फॅन फोलोईंगही खूप आहे. 


नुकतीच ऋचाने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावरून एक गुड न्यूज दिली आहे. ऋचा दुसऱ्यांदा आई होणार आहे. आपल्या इन्टाग्रामवर तिने आपल्या लहान मुलीचा फोटो शेअर केला आहे. तिच्या फोटोवर टेलिव्हिजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनी आणि तिच्या चाहत्यांनी कौैतुकाचा वर्षाव केला आहे. 



ज्याच्यासमोर तिने एक फळा ठेवला आहे आणि त्यावर बीग सिस्टर असं लिहिलं आहे आणि कॅप्शनमध्ये वन मोअर टू अडोर असं लिहिलं आहे आणि त्यापुढे कमिंग सून असं म्हटलं आहे त्यामुळे लवकरच ऋचाकडे दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. 
2019 मध्ये ऋचाने एका लहान मुलीला जन्म दिला आहे. 2015 मध्ये ऋचाचे लग्न झालं. त्यानंतर तिने आपल्या करिअरमधून ब्रेक घेतला. 2009 मध्ये तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. स्टार प्रवाहच्या चार चौघी या मालिकेत तिने प्रमुख भुमिका निभावली होती.