टिव्हीवरील संस्कारी बहू Anupama चे 22 वर्षांपुर्वी फोटो व्हायरल.. पाहून तुमची काय असेल प्रतिक्रिया
पण तिची फॅशन स्टाईलही चाहत्यांनाही आवडते.
Rupali Ganguly Shocking Transformation: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने 'अनुपमा' बनून लाखो लोकांची मने जिंकली आहेत. हा शो टीआरपीच्या यादीतही अव्वल आहे. शोमधील रुपाली गांगुलीचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडतोच पण तिची फॅशन स्टाईलही चाहत्यांनाही आवडते.
रुपाली गांगुलीने 22 वर्षांपूर्वी टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले होते आणि या 22 वर्षांत रुपाली गांगुलीच्या करिअरचा आलेख तर बदललाच पण तिचा लूकही पूर्णपणे बदलला आहे. त्याच्या जुन्या फोटोंतून तिला ओळखणेही अवघड झाले आहे.
तिने टीव्हीपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने मिथुन चक्रवर्तीसोबत 'अंगारा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. रुपाली गांगुलीने 2000 मध्ये 'सुकन्या' या मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केले. या मालिकेतील तिचा अभिनयही लोकांना खूप आवडला होता.
रुपालीनेही पडद्यावर खलनायिकेची भूमिका साकारली आहे. तिने 'संजीवनी' या मालिकेत खलनायिकेची भूमिका केली होती, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचं नामांकनही मिळाले होते.
'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेत तिनं मोनिषाची भूमिका साकारली होती. कॉमेडी शोमध्येही रुपालीने आपल्या अभिनयाने छाप पाडली होती. त्यानंतर तिनं 'परवरिश' या मालिकेत प्रियाची भूमिका साकारली होती. या शोमध्ये ती श्वेता तिवारीसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
रुपाली गांगुली नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. रुपाली गांगुलीच्या या पोस्ट्स पाहता, असे म्हणता येईल की ती देसी शैलीतही ग्लॅमरस स्वभाव ठेवते.