मुंबई : सध्याच्या घडीला वाहणारे लग्नाचे वारे कलाविश्वातही येऊन पोहोचले आहेत. टेलिव्हिजन आणि चित्रपट विश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात काही नात्यांना नवी ओळख देत आहेत, तर काही सेलिब्रिटी त्यांच्या मित्रमंडळीच्या धमाल करत आहेत. यातच सध्या अशी माहिती समोर आली आहे जी पाहता अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या चाहत्यांच्या वर्तुळात आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता अर्जुन बिजलानी याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे आणि तिचा प्रियकर विकी जैन हे दोघंही कोणा एका जवळच्या लग्नसोहळ्याचा आनंद आनंद घेताना दिसत आहेत. याच व्हि़डिओत अंकिता विकीला किसही करते. तिचा हा अंदाज पाहता, एका अर्थी या नात्याची ग्वाहीच तिने सर्वांसमक्ष दिली आहे, असं म्हणायला हरकत नाही. 


'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय विश्वात पदार्पण करणाऱ्या आणि प्रसिद्धीझोतात येणाऱ्या अंकिताने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. याचदरम्यान सहकलाकार सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. ज्यानंतर पुन्हा अंकिताने करिअरला प्राधान्य दिलं. अभिनेत्री कंगना रानौत हिची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'मणिकर्णिका....'या चित्रपटातूनही ती एका लहान पण, तितक्याच महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. अंकिताही ही एकंदर वाटचाल पाहता सध्याच्या घडीला ती कारकिर्दीवरही लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. 



काही दिवसांपूर्वी ती आणि विकी लग्नाच्या बेडित अडकणार असल्याच्याही चर्चा होत्या. पण, अंकिताने त्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. असं काही असल्यास माध्यमांना त्यासंबंधीची रितसर माहिती देण्यात येईल असंही तिने सांगितलं होतं. त्यामुळे आता बहुचर्चित सेलिब्रिटी जोड्यांमध्ये अंकिता-विकी त्यांच्या लग्नाविषयीची आनंदवार्ता केव्हा देतात याकडे चाहत्यांचंही लक्ष लागलं आहे.