मुंबई : 'साथ निभाना साथिया' या माकिलेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्रीबद्दल सध्या बरीच चर्चा होत आहे. या मालिकेमध्ये खलनायकी भूमिकेमध्ये दिसलेल्या आणि उर्मिला ही भूमिका साकारलेल्या वंदना विठलानी यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या नव्या व्यवसायाविषयी माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हमारी बहू सिल्क' या मालिकेनंतरपासून वंदना यांच्याकडे काम नाही. ज्यानंतर मालिकेतील अनेक कलाकारांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


वंदना विठलानी यांनाही या परिस्थितीचा फटका बसला. ज्यामध्ये त्यांनी स्वत:च्या अभिनय कौशल्यावर लक्ष केंद्रीत करणं मात्र सुरु ठेवलं. सोबतच आर्थिक अडचणीमुळेच नव्हे, तर आवड म्हणून आपण राखी बनवत असल्याची माहिती दिली.  माध्यमांशी संवाद साधतेवेळी वंदना म्हणाली, 'अभिनेत्रीव्यतिरिक्त मी अंकज्योतिषशास्त्रंही शिकले आहे. त्याच धर्तीवर मी या राख्या बनवत आहे. अनेकांच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट आणण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. कोणालाही त्यांचा भाऊ, बहीणीला राखी पाठवायची आहे, तर मग अंकज्योतिषशास्त्राच्या अनुषंगानं आम्ही राखीचा रंग ठरवतो आणि तशी राखी बनवतो. मला यासाठी फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे मी पहिल्यांदाच करत असल्याचा मला फार आनंद होत आहे'. 


एक राखी बनवण्यासाठी वंदनाला ३५-४० मिनिटं लागतात, ज्यासाठी ती राखीच्या विविध प्रकारांवरुन दर ठरवले जातात. फेसबुकवर वंदनानं तिच्या राख्यांच्या या नव्या व्यवसायाची माहिती दिली, ज्यानंतर आता पुढं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती हा व्यवसाय आणखी विस्तारु पाहात आहे. 




सध्याच्या घडीला मालिकांच्या चित्रीकरणास पुन्हा एकदा सुरुवात झाली असली तरीही, वंदनाकडे मात्र कोणत्याही मालिकेचं काम नाही. अमुक एका कार्यक्रमाच्या एखाद्या भागासाठी तिच्याकडे विचारणाही होते. तिनं काही ऑडिशन्सही दिल्या आहेत, पण त्यावर मात्र अद्यापही पुढील पावलं उचलली गेली नाहीत. त्यामुळं तुर्तास वंदना तिच्या या नव्या व्यवसायात रमत असून, एका नव्या विश्वात आपल्या कलागुणांना वाव देत आहे, असं म्हणायला हरकत नाही.