एका सिनेमासाठी इतके पैसे घेतो साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन
साऊथ सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा म्हणजे अल्लू अर्जुन. लोकप्रियतेच्या बाबतीत अल्लू अर्जुन अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकतो. अल्लू अर्जुन तेलुगु सिनेमातील अनेक स्टार्सपैकी एक स्टार आहे.
मुंबई : साऊथ सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा म्हणजे अल्लू अर्जुन. लोकप्रियतेच्या बाबतीत अल्लू अर्जुन अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकतो. अल्लू अर्जुन तेलुगु सिनेमातील अनेक स्टार्सपैकी एक स्टार आहे.
अल्लू अर्जुनने त्याच्या करिअरची सुरूवात चाईल्ड आर्टीस्ट म्हणून केली होती. तर लीड हिरो म्हणून त्याने ‘गंगोत्री’ या सिनेमापासून करिअरची सुरुवात केली. मात्र आर्या या सिनेमामुळे तो सुपरस्टार झाला.
या सिनेमाने त्याचं करिअर उंच शिखरावर नेऊन ठेवलं. त्याच्या या सिनेमातील अभिनयाचं मोठं कौतुक केलं गेलं आणि या सिनेमासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एकापाठी एक सुपरहिट सिनेमांची रांगच त्याने लावली.
त्याच्याकडे आता निर्माते लाईन लावतात. अल्लू अर्जुनचं स्टारडम पाहता तो एका सिनेमासाठी किती पैसे घेत असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये असते. मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन एका सिनेमासाठी तब्बल १४ ते १५ कोटी रूपये मानधन घेतो. अल्लू अर्जुन हा प्रभासआधी असा एकुलता एक अभिनेता होता ज्याचे फेसबुकवर १ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यासोबत अल्लू अर्जुनचं नाव सर्वात जास्त कमाई करणा-या अभिनेत्यांच्या फोर्ब्सच्या यादीतही आहे.