मुंबई : कोरियोग्राफर टेरेन्स लुईसने नोरा फतेहीला (Nora Fatehi)  चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला? यावरून काही वर्षांपूर्वी बराच वाद झाला होता. वास्तविक, 'इंडियाज बेस्ट डान्सर' (India's Best Dancer) या रिअॅलिटी शोच्या सेटवरील नोरा आणि टेरेन्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यानंतर लोकांनी असा दावा केला की टेरेन्सने नोराला अयोग्यरित्या स्पर्श केला होता. टेरेन्स लुईसनं (Terence Lewis) आता स्वत:वरील या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनीष पॉलच्या पॉडकास्टवर टेरेन्स लुईसनं त्याच्यावरील आरोप पूर्णपणे नाकारले आहेत. टेरेन्स लुईस यावर त्याचे स्पष्टीकरण देत सांगितले की, ही एक अतिशय सामान्य परिस्थिती होती. शोमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी आले होते. गीता कपूर यांना वाटले की त्यांचे स्वागत आपण चांगल्या प्रकारे केले पाहिजे. त्या आठवड्यात शोच्या जज मलायका अरोरा यांना कोविड झाला होता. अशा परिस्थितीत मलायकाऐवजी नोरा फतेही शोमध्ये आली होती.


याविषयी सांगताना टेरेन्स म्हणाला, 'मी गीताच्या या आयड्यावर मी होकार दिला, आम्ही त्या दोघांना पूर्ण नमस्कार अभिवादन करू असं ठरवलं. आम्ही शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नीला आदरपूर्वक अभिवादन केलं, परंतु गीताला वाटले की ते पुरेसे नाही, आपण काहीतरी वेगळे केलं पाहिजे, म्हणून आम्ही गीताचे ऐकले. माझ्या हाताला नोराने स्पर्श केला होता की नाही हे देखील मला आठवत नाही. खर तर हाताला स्पर्श झाला होता की नाही हे देखील माहित नाही.


टेरेन्स पुढे म्हणाले, 'माझ्या आजूबाजूला कॅमेरे असताना मला एखाद्याला अयोग्यरित्या स्पर्श का करावासा वाटेल. ही खूप चिप गोष्ट आहे. आपण असं करू शकत नाही. मला मेसेजमध्ये शिवीगाळ करण्यात आली. (terence lewis opens up on controversial video claiming touching nora fatehi inappropriately )


याविषयी सांगताना टेरेन्स पुढे म्हणाला, 'मी याआधीही शोमध्ये नोरासोबत जवळून डान्स केला होता आणि जेव्हा तुम्ही परफॉर्मन्सच्या मध्यभागी असता तेव्हा तुम्ही त्या झोनमध्ये जाण्याचा विचारही करत नाही. अशा प्रकारची कृती करण्यासाठी खूप हिंमत लागते.  टेरेन्स लुईसनं हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हाही स्वतःचा बचाव केला आणि त्यानं स्वतःला निर्दोष म्हटले होते. या व्हिडिओशी छेडछाड करण्यात आल्याचे टेरेन्सने म्हटले आहे. आता पुन्हा एकदा टेरेन्सनं आपण नोरा फतेहीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला नसल्याचे स्पष्ट केले आहे