मुंबई:'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमा आज प्रदर्शित झाला. संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित सिनेमा 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' माजी पंतप्रधान मनमोहन सिंगयांच्या कार्यकाळावर आधारित आहे. आज प्रदर्शित झालेल्या सिनेमाचे काही किस्से समोर आलेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंगयांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत, संजय बारुयांच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहेत.'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाची पहिली गोष्ट समोर येते ती म्हणजे,मनमोहन सिंगहे प्रत्येक वेळेस सोनिया गांधी बोलतील तेच करायचे. संजय बरु यांचं एवढच दु:ख नव्हतं.तर सिनेमामध्ये दाखवल्या प्रमाणे मनमोहन सिंग त्यंच्या मीडिया अॅडवायजरची कोणतीच गोष्ट ऐकत नसत. पहिल्याच सिन मध्ये संजय बारु  पीएमओ मध्ये आपली राजेशाही थाटण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसतात.सिनेमात मनमोहन सिंग कॅंग्रेसचे नाही तर विरोधी पक्षाचे सरकार चालवताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


2004 मध्ये कॉंग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी पंतप्रधान होतील अशी दृढ इच्छा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची होती. सुझेन बर्नेट यांनी सोनिया गांधीची व्यक्तिरेखा साकारली आहे. विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शित 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाने पहिल्याच दिवसात 3 कोटींचा गल्ला पार केला. सिनेमाच्या मुख्य भूमिकेत अक्षय खन्ना, अनुपम खेर, सुझेन बर्नेट अर्जुन माथुर, आहाना कुम्रा प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.