मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आधीचे तिन्ही सीझन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. गेले अनेक दिवस येत्या सीझनचं सुत्रसंचालन कोण करणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण बिग बॉस ४चा नुकताच समोर आलेल्या प्रोमोवरुन याही सिझनचं सुत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असल्याने प्रेक्षक सुखावले आहेत. बिग बॉसचे स्पर्धक नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. असाच एक स्पर्धक सध्या जोरदार चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये  दिसलेला अभिनेता आविष्कार दारव्हेकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आविष्कारने बिग बॉसच्या घरात दणक्यात एन्ट्री घेतली होती. त्यावेळी त्याची Ex-wife म्हणजेच अभिनेत्री स्नेहा वाघसुद्धा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आविष्कार दारव्हेकर चर्चेत आला आहे. त्याने पुन्हा एकदा लग्न केलं आहे. वैयक्तिक आयुष्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.   


आविष्कारने सोशल मीडियावर त्याचे आणि त्याच्या पत्नीचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले आहे. आविष्कारने नुकताच त्याच्या पत्नीचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने एक स्पेशल फोटो शेअर केला. या फोटोंमध्ये असलेली मुलगी त्याची बायको असल्याचं समजतंय. ही आविष्कारची तिसरी बायको असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या या स्पेशल फोटो आणि व्हिडिओमधून आविष्कार पुन्हा एकदा बोहल्यावर चढलाय. मात्र, त्याच्या बायकोबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसंच आविष्कारनेही याबद्दल काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. 


इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत आविष्कारने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,. "तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी खूप आभार. सर्वाना खूप प्रेम. तुमच्या शुभेच्छा मला पुढचं पाउल टाकत राहायला बळ देतं'' त्याच्या या फोटोवर अनेक कमेंट येत आहेत. 



आविष्कार बिग बॉस मराठी सीझन 3मध्ये स्पर्धक म्हणून समोर आला होता. त्याचा खेळही हळुहळु प्रेक्षकांना आवडायला लागला होता. महत्त्वाचं म्हणचे त्याने कार्यक्रमात आधीचं रिलेशन किंवा लग्नाबद्दल कधी काही भाष्य केलेलं नाही. मात्र, बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघ आणि आविष्कार एकत्र दिसले, आणि त्यांचं लग्न, मग झालेला घटस्फोट याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली. स्नेहा 19 वर्षांची असताना हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. पण त्यांचं हे नातं फारकाळ टिकलं नाही.