‘प्रोड्यूसरने मला कपड्याविना लाईनमध्ये उभं केलं’
अलिकडे जगभरात महिलांच्या शोषणावर खुलेपणाने बोलले जात आहे. त्याला विरोधात चळवळ उभी केली जात आहे. सोशल मीडियात एक कॅम्पेनही चालवलं जात आहे.
नवी दिल्ली : अलिकडे जगभरात महिलांच्या शोषणावर खुलेपणाने बोलले जात आहे. त्याला विरोधात चळवळ उभी केली जात आहे. सोशल मीडियात एक कॅम्पेनही चालवलं जात आहे.
अनेक हॉलिवूड अभिनेत्रींनी देखील त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचाराला अनेकदा वाचा फोडली आहे. आता प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सने सुद्धा करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात तिला कराव्या लागलेल्या संघर्षाबाबत आणि तिच्या शोषणाबद्दल सांगितलं आहे.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जेनिफरने तिच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना सर्वांसमोर मांडली आहे. एका निर्मात्याने कशाप्रकारे तिच्यासोबत दुर्व्यवहार केला आणि निर्वस्त्र उभं राहण्यासाठी भाग पाडलं, हे तिने सांगितलं. जेनिफर म्हणाली की, हा अनुभव तिच्यासाठी लाजिरवाणा आणि दु:खदायी होता.
ती म्हणाली की, तिने करिअरची नुकतीच सुरूवात केली होती. त्या निर्मात्याने तिला दोन आठवड्यात १५ पाऊंड वजन कमी करण्यास सांगितले. याआधी एका महिलेला वजन कमी न केल्याने या प्रोजेक्टमधून काढण्यात आले होते. यादरम्यान त्या महिला निर्मातीने जेनिफरला अंगावर एकही कपडा न घातला इतर पाच पहिलांसोबत उभं केलं. त्या जेनिफरपेक्षा बारीक होत्या. जेनिफर पाचही महिलांसोबत लाईनमध्ये अंगावर एकही कपडा नसलेल्या अवस्थेत उभी होती. त्यानंतर निर्माती म्हणाली की, डाएटसाठी प्रेरणा मिळावी म्हणून स्वत:चा न्यूड फोटो सतत बघितला पाहिले.
जेनिफर म्हणाली की, त्याक्षणी मला अतिशय लाजिरवाणं, असहाय आणि फसल्याचं जाणवत होतं. मी माझ्यासोबत हे होऊ दिलं कारण मला त्यावेळी वाटलं की, मला माझं करिअर बनवण्यासाठी असे करावेच लागेल.