मुंबई : अभिनय क्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे मंगेश देसाई. मंगेशने अभिनयक्षेत्रात काम करत निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. 'धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे' या चित्रपटामुळे त्याला निर्माता म्हणून वेगळी ओळख मिळाली. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून मंगेश देसाईकडे पाहिलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता, निर्माता मंगेश देसाईच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येतेय.  मंगेश देसाई कुटुंबासोबत कर्जत येथे जात असताताना  वाशी, कोकण भवन येथे त्याच्या कारला अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. परिवारासोबत कर्जतला जाताना त्याच्यासोबत हा अपघात झाला आहे. 


मंगेशने विविधांगी भूमिकांमधून अभिनयाची छाप त्याने प्रेक्षकांवर पाडली. 'धर्मवीर' या चित्रपटातून मंगेश देसाईंनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं. अभिनेता-निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळताना ते त्यांच्या कुटुंबालाही तितकाच वेळ देताना दिसतो. त्यांची निर्मिती असलेला धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे  हा सिनेमा खूपच यशस्वी ठरला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमामध्ये प्रसाद ओक याची प्रमुख भूमिका आहे.



त्याच्या अपघाताच्या बातमीनंतर सिनेसृष्टीतून तसंच त्याच्या चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.  त्याने स्वत: एर व्हिडिओ शेअर करत मी आणि माझी फॅमिली व्यव्स्थित असल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी काळीजी करु नये असंही तो म्हणाला आहे.