मुंबई : कोरोना या एका अदृश्य व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोरोना रूग्णांची संख्या तर वाढतचं आहे. पण दुसरीकडे मृतांची संख्या देखील वाढत आहे. या व्हायरस मुळे अनेकांनी आपल्या जवळच्या आणि खास लोकांना गमावलं आहे.  अनेक लहान मुलांनी तर स्वतःच्या आई-वडिलांना गमावलं आहे. अशा मुलांच्या मदतीला आभिनेत्री करीना कपूर खान धावून आली आहे.  करीना कपूरने चाइल्ड रेस्क्यू हेल्पलाईनची सर्व माहिती तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 
 
पोस्टच्या माध्यमातून करीनाने तिच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना मदतीसाठी एक पाऊल पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. करीनाने Akancha संस्थेची सर्व माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. करीनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. करीनाच्या या पुढाकारामुळे अनेक मुलांची मदत होईल. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीनाने सर्व माहिती पोस्ट करत, कॅप्शनमध्ये 'माझं मन त्या मुलांसाठी दुःखी होतं, ज्यांनी या महामारीमध्ये त्यांच्या आई-वडिलांना गमावलेलं आहे. त्यामुळे कृपा करून नॅशनल चाईल्ड हेल्पलाईन नंबरवर फोन करून मुलांबद्दल माहिती द्या. आपण त्यांचं दुःख समजू देखील नाही शकतं.' असं लिहिलं आहे. 


दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे दिवसाला हजारो रूग्णांना आपल्या जीवाची आहूती द्यावी लागत आहे. कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनामुळे सर्वचं त्रस्त आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे. कोणी ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत, तर कही फंड गोळा करण्यात व्यस्त आहेत.