मुंबई : अनेकदा स्टार्सच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधीकधी स्टार्स त्यांच्या बालपणीच्या फोटोंमध्ये इतके वेगळे दिसतात की, चाहते त्यांना ओळखण्यात गोंधळतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत एक गोंडस मुलगी दिसत आहे. हा फोटो पाहून ही अभिनेत्री कोण आहे हे ओळखणं तुम्हाला कठिण होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेच्या आइडेंटिटी कार्डचा फोटो व्हायरल
अभिनेत्रींच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. या फोटोसोबत मुलीच्या शाळेचं आइडेंटिटी कार्डही व्हायरल होत आहे. जे पाहून लोकं या मुलीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुलीच्या शाळेच्या ओळखपत्रावर मुंबईतील जुहू येथील शाळेचा पत्ता असून ती पाम बीच नर्सरी स्कूल आहे.


तुम्ही ओळखलं का?
 या मुलीचा फोटो पाहून  तुम्हाला ओळखता येईल का, ती कोण आहे? नसेल तर अजिबात काळजी करू नका. आम्ही तुमची ही समस्या दूर करू. ही गोंडस मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून निधी शाह आहे. जी टीव्ही सीरियल 'अनुपमा' मध्ये किंजलची भूमिका साकारत आहे.