Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. मलायका तिच्या हटके स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. मलायकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहता. अनेकदा या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे मलायका ही ट्रोलिंगचा सामना करत असल्याचे आपण पाहतो. मात्र, आता मलायकाचे एका व्हायरल व्हिडीओमुळे कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका अरोराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायकानं एक लाल रंगाची शिमरी साडी नेसल्याचे पाहायला मिळते. त्यात मलायका खूप सुंदर दिसत आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे मलायकाच्या चांगल्या वागणूकीनं वेधलं आहे. मलायकाच्या एका दिव्यांग चाहत्याला तिच्यासोबत फोटो काढायचा होता. मलायकानं फोटो काढण्यासाठी होकार देताच तो धावत तिच्याजवळ गेला. मलायकासोबत फोटो काढत असताना त्यानं थेट तिच्या कंबरेवर हात ठेवला. मात्र, मलायका चिडली नाही. तिनं हसत त्या चाहत्यासोबत फोटो काढला. त्यानंतर मलायकानं इतर चाहत्यांसोबत देखील फोटो काढला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी कमेंट करत तिची स्तुती करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, मलायकानं काहीही रिअॅक्शन दिली नाही कारण तिला त्या माणसाची परिस्थिती काय आहे... दुसरा नेटकरी म्हणाला, मलायकाचं मन खूप चांगलं आहे... मला ती खूप आवडते. तिसरा नेटकरी म्हणाला, मलायका खूप चांगल्या मनाची आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, आज मनात तुझ्याविषयीचा आदर खूप वाढला आहे. 


मलायकाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या छोट्या पडद्यावरील 'झलक दिखला जा' ची परिक्षक म्हणून काम करते. तर या कार्यक्रमाचं हे 11 वं पर्व सुरु आहे. या कार्यक्रमात मलायकासोबत फराह खान आणि अर्शद वारसी हे परिक्षक आहेत. तर हा शो काही वर्षे कलर्सवर दाखवत होते. तर आता तब्बल 12 वर्षांनी हा शो त्याच्या मूळ प्लॅटफॉर्म सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर दाखवला जात आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'कॉफी विथ करण'च्या एपिसोडमध्ये अर्जुन कपूरला त्याच्या आणि मलायकाच्या लग्नाविषयी विचारण्यात आलं होतं.