Stree 2 : अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री 2' हा चित्रपट काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फारच कमी वेळ आता शिल्लक राहिला आहे. दरम्यान, 'स्त्री 2' या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी सुरुवात झाली आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची 60 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' हा चित्रपट 2024 मधील सर्वात चर्चेत असणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला देखील सुरुवात झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका अहवालानुसार आतापर्यंत 'स्त्री 2' या चित्रपटाची 64,522 तिकिटे विकली गेली आहेत. प्रदर्शित होण्यापूर्वीच 'स्त्री 2' चित्रपटाने 2.23 कोटींची कमाई केली आहे. 


या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित 


'स्त्री 2' चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. नियोजित तारखेच्या एक दिवस आधी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधील गाणी देखील चांगलीच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून गाण्यांना पसंती मिळत आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री 2' हा चित्रपट 15 ऑगस्ट ऐवजी 14 ऑगस्टला रात्री 9.30 वाजता प्रदर्शित होणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2018 मधील 'स्त्री'चित्रपटाचा सिक्वेल


श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्यासह या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांच्यासारखे कॉमेडी कलाकार या चित्रपटात दिसणार आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री'चा हा सिक्वेल आहे.