Stree 2 : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाची चाहते खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता 'स्त्री 2' च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल चांगली बातमी दिली आहे. 'स्त्री 2' हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मात्र, तुम्ही हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला 15 ऑगस्टची वाट पाहण्याची गरज नाही. सध्या चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या उत्साहात सुरु आहे. कॉमेडीने भरलेला हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्त्री 2'ची तारीख बदलली 


'स्त्री 2' या चित्रपटाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्यासह संपूर्ण कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. 'स्त्री 2' हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र. आता चित्रपटाची तारीख बदलली आहे. 'स्त्री 2' हा चित्रपट 14 ऑगस्टला रात्री 9.30 वाजता प्रदर्शित होणार आहे. 


आतापासूनच बुकिंग सुरु 


'स्त्री 2' चित्रपटाच्या बुकिंगला शनिवार पासूनच सुरुवात झाली आहे. 14 ऑगस्टला रात्री 'स्त्री 2' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रात्री 9.30 वाजता हा शो सुरु होणार आहे. स्टुडिओने चित्रपटाच्या पोस्टसोबत कॅप्शन दिले आहे की, 'ती एक महिला आहे, ती काहीही करु शकते! म्हणूनच ती रात्री लवकर येत आहे, फक्त तुझ्यासाठी. 14 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9.30 वाजता' असं त्यांनी म्हटले आहे. 



2018 चा 'स्त्री'


2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या 'स्त्री' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.