मुंबई : 'द कश्मीर फाइल्स' प्रमाणेच आणखी एक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आहे. चित्रपटाचं नाव आहे - The Conversion. या चित्रपटात विंध्या तिवारी आणि प्रतीक शुक्ला यांची प्रमुख भूमिका आहे... विनोद तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. धर्मांतर आणि प्रेमविवाहाचं पैलू दाखवणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद तिवारी म्हणाले की, 'द कन्व्हर्जन' हा चित्रपट 6 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या माध्यमातून भारतात प्रेमविवाहादरम्यान धर्मांतराच्या प्रयत्नांशी संबंधित मुद्दा अतिशय गंभीरपणे मांडण्यात आला आहे. माझी ओळख लपवणं आणि माझ्या मुलीचा विश्वासघात करणाऱ्यांचा पर्दाफाश करणं हा माझा उद्देश आहे.


तिवारी पुढे म्हणाले की, 'देशात घडणाऱ्या लव्ह जिहादच्या घटनांपासून भारतातील प्रत्येक मुलीला वाचवणं आणि लव्ह जिहादच्या दलदलीत भारताची एकही मुलगी अडकू नये. हा चित्रपट बनवण्याचा उद्देश आहे.' द काश्मीर फाइल्सशी तुलना करताना, विनोद तिवारी म्हणाले, "आज, भारतातील प्रेक्षक सिनेमाशी खूप जोडलेले आहेत. आणि त्यांना त्यांचा देश आणि... संस्कृती चित्रपटांद्वारे जाणून घ्यायची आहे.".


तबादला, तेरी भाभी है पगले यांसारखे चित्रपट बनवणारे विनोद तिवारी म्हणतात, 'देशातील लव्ह जिहादवर प्रत्येक व्यासपीठावर खुलेपणाने चर्चा व्हायला हवी, फक्त भाजपच नाही तर देशातील प्रत्येक पक्षासोबत. खुल्या मनाने लव्ह जिहादवर चर्चा झाली पाहिजे.


'द कन्व्हर्जन'मध्ये विंध्या तिवारी आणि प्रतीक शुक्ला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय रवी भाटिया, विभा छिब्बर, मनोज जोशी, अमित बहल, सुनीता राजभर, संदीप यादव आणि सुशील यादव हे कलाकारही चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.


अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, आनंद, जबलपूर, ग्वाल्हेर आणि मुंबई या शहरांमध्ये या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. वंदना तिवारी 'द कन्व्हर्जन'च्या लेखिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती राज पटेल, विपुल पटेल आणि राज नॉस्ट्रम यांनी 'नोस्ट्रम एंटरटेनमेंट हब' या बॅनरखाली केली आहे. चित्रपटाचं संगीत अनामिका चौहानने दिलं आहे.