45 कोटी बजेट, कमाई 60 हजार रुपये, `हा` आहे भारतातील सर्वात फ्लॉप चित्रपट
देशातील सर्वात फ्लॉप चित्रपट म्हणून या चित्रपटाला ओळखलं जात. हा चित्रपट इतका फ्लॉप ठरला की त्यामुळे निर्मात्यांना मोठ्या वादाला सामोरे जावे लागले. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
The Lady Killer : बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे कमी बजेट असूनही मोठ्या प्रमाणात कमाई करून अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडतात. परंतु देशातील असा एक चित्रपट आहे. जो सर्वात फ्लॉप चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाचे बजेट 45 कोटी रुपये होते. मात्र, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होताच फ्लॉप ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 60 हजार रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर OTT वर देखील या चित्रपटाला नाकार देण्यात आला.
आज आम्ही तुम्हाला अशाच एक चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. जो देशातील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांमध्ये गणला जातो. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट आहे.
चित्रपटाचे नाव काय?
देशातील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटाचे नाव 'द लेडी किलर' आहे. हा क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. अजय बहलने हा चित्रपट बनवला होता. हा चित्रपट भारतातील सर्वात मोठा बॉक्स ऑफिस फ्लॉप चित्रपट होता. ज्यामध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर दिसले होते.
टी-सीरिजच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपट निर्मात्यांनी 45 कोटी रुपये खर्च केला होता. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 60 हजार रुपयांची कमाई केली होती.
'द लेडी किलर' का फ्लॉप झाला?
रिपोर्टनुसार, 'द लेडी किलर' हा चित्रपट अर्धवट रिलीज केला गेला होता. या चित्रपटाचा क्लाईमेक्स देखील पूर्ण शूट केला नव्हता. यामुळे या चित्रपटाची OTT प्लेटफॉर्म संदर्भातील डील नाकारण्यात आली. सुरुवातीला अशी चर्चा होती की 'द लेडी किलर' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर विकत घेण्यात आला आहे. परंतु जेव्हा वाद झाला आणि चित्रपटाची गुणवत्ता तपासली त्यानंतर नेटफ्लिक्सने चित्रपटाला नकार दिला.
युट्यूबवर करण्यात आला रिलीज
'द लेडी किलर' या चित्रपटाला अर्धवट रिलीज करण्याच्या वादावर देखील अभिनेता अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. वादानंतर त्यांनी देखील हा चित्रपट प्रमोट केला नाही. OTT वर रिलीज करण्यास नकार मिळाल्यानंतर हा चित्रपट युट्यूबवर फ्रीमध्ये रिलीज करण्यात आला. आतापर्यंत हा चित्रपट 2.4 मिलियन लोकांनी पाहिला आहे.