रोडीज फेम रणविजयच्या मुलाची पहिली झलक
पाहा रणविजयच्या दुसऱ्या बाळाचा फोटो
मुंबई : रोडीज फेम रणविजय सिंग आणि पत्नी प्रियंकाने 12 जुलै रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. रणविजयने त्याच्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. फोटोमध्ये रणविजयने त्याच्या मुलाचा हात हातात घेतला आहे. फोटो शेअर करत रणविजयने #grateful #blessed #satnamwaheguru असं लिहिलं आहे. आता सोशल मीडियवर रणविजयला प्रत्येक जण शुभेच्छा देत आहेत.
अभिनेता अर्जुन रामपाल, ऋत्विक धनजानी, करणवीर बोहरा, वरूण सुद, अभिनेत्री अनीता हसनंदानी, युविका चौधरी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात रणविजयने बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. लंडनमध्ये त्यांनी मोठ्या थाटात बेबी शॉव्हर साजरा केला.
रणविजय दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. 2017मध्ये त्यांच्या आयुष्यात चिमुकलीने एन्ट्री केली. त्याच्या मुलीचं नाव Kainaat आहे. रणविजयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, रणविजय सध्या अभिनेत्री सनी लिओनीसोबत स्पिलिस्टव्हीला शोला होस्ट करत आहे. टीव्ही शिवाय रणविजयने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. 'लंडन ड्रिम्स', 'ऍक्शन रीप्ले', 'मुंबई कटींग', 'धर्ती' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली.