दीपिका पदुकोणला पहिला सिनेमा देण्यात होता `या` व्यक्तीचा हात
अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज कोण ओळखत नाही. या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. दीपिका पदुकोणने तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस शैलीने लाखो चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. आज दीपिका बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की, तिचा पहिला चित्रपट मिळवण्यामागे कोणाचा हात होता. दीपिका पदुकोणचा पहिला चित्रपट ओम शांती ओम सिनेमाच्या मागे मलायका अरोराचा खारीचा वाटा आहे.
दीपिका पदुकोणने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. याची सर्वांनाच कल्पना आहे. फॅशन डिझायनर वैंडेल रॉड्रिक्स दीपिका पदुकोणला चांगले ओळखत होते. दीपिका मुंबईत आली तेव्हा तिने फॅशन डिझायनर वैंडेल रॉड्रिक्ससोबत दोन वर्षे काम केलं. त्यानंतर फॅशन डिझायनरने दीपिकाला मलायका अरोरा भेटायला लावलं. जेव्हा दीपिका मलाइकाला भेटली तेव्हा दोघांमध्ये खूप चांगलं बॉन्ड निर्माण झालं.
फराह खान त्यावेळी तिच्या ओम शांती ओम या चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होती. त्यानंतर मलायका अरोराने फराहला दीपिकाबद्दल सांगितलं. खुद्द दीपिका पदुकोणने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, फराह खानने दीपिका पदुकोणला ओम शांती ओम या चित्रपटासाठी ऑडिशन न देता साइन केलं होतं. दीपिकाने असंही म्हटलं होतं की, तिला असं काम कसं दिलं गेलं याचा तिला अजूनही विचार आहे. दीपिका पदुकोणचा पहिला चित्रपट ओम शांती ओम 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता.