मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) आपल्या अफाट विनोद बुद्घीच्या जोरावर चाहत्यांचं खळखळून मनोरंजन केलंय. तसेच कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) या कॉमेडी शोद्वारेही तो अनेकांना पोट धरुन हसायला भाग पाडतो. कपिलच्या या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी येत असतात. अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांच्या आगामी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होत असतात. मात्र आता हा शो एका वेगळ्या कारणामुळेच चर्चेत आला आहे. (the kapil sharma show actress sonali kulkarni appeal to kapil sharma on speak marathi language after shibani dandekar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मराठी अभिनेत्रीने कपिलला मराठी येत नसल्याने त्याला झापलं आहे. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोनी टीव्हीने इंस्टाग्रामवर व्हीडिओ शेअर केला आहे. 


व्हीसलब्लोअर या वेबसीरिजच्या (Whistleblower Web Series) प्रमोशनसाठी अभिनेत्री (Sonali Kulkarni) सोनाली कुलकर्णी, अभिनेता सचिन खेडेकर (Sachin Khedekar) आणि अभिनेता खासदार रवी किशन (Ravi Kishan) हे "द कपिल शर्मा" शो मध्ये सहभागी झाले होते. या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. 


नक्की काय झालं? 
 
"मी इतके सिनेमे केले पण तुझ्या या कार्यक्रमाच्या सेटवर येण्याचा योग आला नाही, असं सोनाली कुलकर्णी म्हणाल्या. त्यावर "तुम्ही आमच्या सेटवर आलात हे आमचं भाग्यचं", असं उत्तर कपिलने दिलं.   


"तु फक्त हिंदी इंग्रजीचीच गोष्ट करशील, थोडं मराठीतही बोल. मुंबईत राहतोस, इतके चांगले अभिनेते आहेत. आमच्याशी मराठीत बोलत नाहीस", अशा शब्दात सोनालीने कपिलला सुनावलं. यावर कपिलने त्याच्या मातृभाषेत म्हणजेच पंजाबीत काही वाक्य बोलून वेळ मारुन नेल्याचं या व्हीडिओत पाहायला मिळतंय. 


दरम्यान कपिलला मराठी न बोलण्यावरुन त्याला सुनावण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी अभिनेत्री, गायिका शिबानी दांडेकरनेही कपिलला मराठी न बोलण्याच्या मुद्द्यावरुन सुनावलं होतं.