The Kapil Sharma Show Fake Comment: कॉमेडियन कपिल शर्मा मागच्या 10 वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. त्याचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' भारतासह जगभरात पाहिला जातो. सध्या हा शो नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालतोय. या कार्यक्रमात बॉलिवूड, क्रिकेटमधील वेगवेगळे सेलिब्रिटी येतात. ज्यांना मजेशीर प्रश्न विचारले जातात, ज्याची तशीच उत्तरे मिळतात. ज्याने लोकांचे चांगलेच मनोरंजन होते. वेगवेगळ्या कारणामुळे हा शो अनेकदा वादातही आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द कपिल शर्मा शोमध्ये विविध लोकांवर कमेंट्स केल्या जातात. ज्यामुळे अनेकजण हसतात तर काहीजण दुखावलेदेखील जातात.WWE कुस्तीपटू आणि 'ब्रह्मास्त्र' अभिनेता सौरव गुर्जर याने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' बद्दल खळबळजनक दावा केला. यानंतर हा वाद उफाळून आला होता. शोमध्ये करण्यात आलेल्या कमेंटमुळे तो दुखावला होता. यानंतर त्याने शोवर आरोप केला होता. शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कमेंट खोट्या होत्या, असे तो म्हणाला होता. आता त्याने पुन्हा दावा केला आहे. मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. प्रेक्षकांना हसवण्यासाठी शोमध्ये खोट्या कमेंट्स वापरल्या जातात, असे त्याने म्हटले.


एका यूट्यूब पॉडकास्टमध्ये अभिनेता सौरव गुर्जर याची मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी तो 'द कपिल शर्मा शो'मध्ये झालेल्या वादाबद्दल बोलत होता. कपिल शर्मा सेलिब्रिटींच्या पोस्टवरच्या टिप्पण्या वाचून दाखवतो. या कमेंट्स नेटिझन्स करतात असे सर्वांना वाटते पण ते खरे नाही.


कपिल शर्माने केली खोटी कमेंट?


कपिल शर्माने केलेल्या 'बीएम बबलू' या कमेंटमुळे सौरभ दुखावला गेला. कारण ही कमेंट आपल्या व्यक्तिमत्त्वावर होती आणि त्याला ते आवडले नव्हते. सौरव म्हणाला, 'आम्ही सर्वजण असे मानतो की कपिलने फोटोत वाचलेल्या कमेंट्स खऱ्या आहेत पण प्रत्यक्षात तसे नाही. तिथे माझा आणि रणबीरचा फोटो होता. त्याने बीएम बबलूची कमेंट वाचली आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विनोद केला. मला ते अजिबात आवडले नाही, असे त्याने मुलाखतीत सांगितले. 


'कपिलच्या टीमशी बोललो'


त्याच मुलाखतीत सौरव गुजर पुढे सांगतो, ज्या फोटोवरच्या कमेंट वाचल्याचा दावा कपिलने केला होता, तो फोटो मी पुन्हा पाहिला. ज्यावरच्या कमेंट पुन्हा वाचल्या. पण मला ती कमेंट सापडली नाही.  मी सांगितल्यानंतर कपिल शर्माच्या टीमने ते पाहिले आणि कमेंट केली, असे सौरभने सांगितले. 'मला हे सर्व आवडते पण मी फक्त गंमत म्हणून खोट्या कमेंट करू शकत नाही.', असेही त्याने पुढे सांगितले. 


कोण आहे सौरव गुर्जर?


सौरव गुर्जरने 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. 2023 मध्ये रणबीर 'द कपिल शर्मा शो'मध्ये आला होता, तेव्हा पोस्टमॉर्टम सेगमेंटदरम्यान रणवीर आणि सौरवच्या एका फोटोवर चर्चा होत होती. त्यावेळी कपिलने रणवीरच्या पोस्टवरील कमेंट वाचली, यानंतर सर्वजण हसले होते.