मुंबई : 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या प्रमोशनशी संबंधित कपिल शर्माचा वाद दिवसें-दिवस वाढत चालला आहे. पण आता समोर आलेल्या बातम्यांवरून असं दिसतंय की, 'द कपिल शर्मा शो' लवकरच बंद होणार आहे. याबाबतचे संकेत कपिल शर्माच्या एका पोस्टवरून मिळाले आहेत. ज्यात त्याने कॅनडा दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून शो बंद होणार असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिलच्या एका पोस्टवरून मिळाला इशारा 
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने काही दिवसांपूर्वी कॅनडा दौऱ्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत कपिलने लिहिलं की, '२०२२ मध्ये माझ्या अमेरिका-कॅनडा दौऱ्याबद्दल घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. तुम्हाला लवकरच भेटेन.


या पोस्टवरुन मिळाला शो बंद होण्याच्या बातम्यांना जोर
कपिल शर्माने ही पोस्ट शेअर करताच शो ऑफ एअर होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. कपिल शर्माने अधिकृतपणे याची पुष्टी केली नाही. समोर आलेल्या बातमीनुसार, कपिल शर्मा शो काही दिवसांसाठी बंद होऊ शकतो.



ट्विटरवर एका व्यक्तीने 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना 'द कपिल शर्मा शो' या लोकप्रिय शोमध्ये हजर राहण्यास सांगितलं, ज्यावर चित्रपट निर्मात्यांनी म्हटलं की, 'हे त्याच्या आणि त्याच्या निर्मात्यांची पसंद आहे की, ते कोणाला आमंत्रित करतील.  जिथं पर्यंत बॉलिवूडची गोष्ट समोर येते तेव्हा मी सांगू ईच्छितो की, ज्याला एकदा श्री बच्चन यांना गांधी यांच्याबद्दल सांगितलं होतं की, वो राजा है, हम रंक.'' या ट्विटनंतर वाद निर्माण झाला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही लोकांनी कपिल शर्माला ट्रोल करण्यास सुरुवात केली.