The Kapil Sharma Show : फक्त जोरजोरात हसण्यासाठी सिद्धू यांना मिळत होतं इतकं मानधन
अर्चना पूरण सिंग यांच्या मानधनाचा आकडाही मोठा...
मुंबई : 'द कपील शर्मा शो'ची चर्चा कायम प्रेक्षकांमध्ये रंगलेली असते. सर्व दुःख विसरून सर्वांना पोट धरून हसवणारा 'द कपील शर्मा शो' ने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. शोमधील विनोदी कलाकारांसह जजच्या गादीवर बसलेली अभिनेत्री अर्चना पूरण सिंग सर्वचं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात. आता जजच्या गादीवर अर्चना आहे, पण पूर्वी नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu)यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण तुम्हाला माहिती आहे , फक्त जोरजोरात हसण्यासाठी सिद्धू यांना इतकं मानधन मिळत होतं.
रिपोर्टनुसार सिद्धू आणि अर्चना यांच्या मानधनात प्रचंड फरक आहे. मानधनात असलेला फरक पाहून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. रिपोर्टनुसार अर्चना 'द कपील शर्मा शो'च्या पूर्ण सिझनसाठी 2 कोटी रूपये मानधन घेते. तर दुसरीकडे सिद्धू पूर्म सिझनसाठी 25 कोटी रूपये मानधन घ्यायचे. महत्त्वाचं म्हणजे कपिल शर्मा शोच्या प्रत्येक अभिनेत्याची फी लाखात आहे.
कपिलच्या शोमध्ये सिद्धू यांची शायरी मोठी भूमिका बजावते. सिद्धू यांच्याकडे 4 वाहने आहेत. ज्यामध्ये 13 लाख किंमतीची टोयोटा लँडक्रूझर, 11.50 लाख किंमतीची टोयोटा कोरोला, 4.60 लाख किंमतीची एंबेसडर आणि 13.40 लाख किमतीची फोर्ड एन्डेव्हर आहे. सिद्धू दोन निवासी घरांचे मालक आहेत, त्यांच्या एका घराची किंमत 60 लाख रूपये तर दुसऱ्या घराची किंमत 70 लाख रूपये आहे.