मुंबई : द काश्मीर फाईल्स सिनेमाला लोकांची पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या भरघोस कमाईमुळे तो सुपरहिट ठरला आहे. छोट्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 120 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीये तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. यामध्ये कंगना राणौत (Kangana Ranaut) ही या कलाकारांपैकी एक आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तिने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे (VIVEK AGNIHOTRI) जोरदार कौतुक केले आहे. आता बातमी अशी आहे की कंगना लवकरच विवेक अग्निहोत्रीसोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करू शकते. (Vivek Agnihotri And Kangana Ranaut To Collaborate soon)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हिट झाल्यानंतर कंगना आणि विवेक लवकरच एका मोठ्या प्रोजेक्टसाठी हात मिळवणी करु शकतात. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विवेकने कंगनाला त्याच्या नवीन चित्रपटासाठी संपर्क साधला आहे. यासंदर्भात दोघांची अनेकदा भेटही झाल्याचं सांगण्यात येत आहे.


'द काश्मीर फाइल्स'च्या यशानंतर विवेक सध्या अनेक कल्पनांवर काम करत आहे. यातील एका कल्पनेवर तो लवकरच त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा करू शकतो. वृत्तांवर विश्वास ठेवला तर त्याला या चित्रपटासाठी कंगनाला कास्ट करायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प अद्याप पहिल्या टप्प्यात आहे.


द काश्मीर फाइल्स रिलीज झाल्यानंतर कंगनाने या चित्रपटाला उघडपणे पाठिंबा दिला होता. कंगनाने विवेक अग्निहोत्रीचे या चित्रपटासाठी अभिनंदन केले. संपूर्ण टीमचे अभिनंदन करताना ती म्हणाली की, हा चित्रपट खरोखरच कौतुकास्पद आहे.