मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच टिकून आहे. रिलीजनंतर सगळीकडे या सिनेमाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे.अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आता घराघरात पोहोचला आहे.

या सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. इकीकडे या सिनेमाच्या स्टोरीवरुन अनेक वाद होत आहेत. तर बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा मोठी कमाई करत आहे. दोन आठवड्यात या सिनेमाने 150 कोटींचा आकडा पार केला आहे.


इतर बॉलिवूड सिनेमे रिलीज होत असतानाही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तग धरुन आहे. हा सिनेमा कमी बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. सिनेमाचं प्रमोशन देखील काही प्रमाणातच करण्यात आलं होतं. आता येत्या आठवड्यात 200 कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे.  

सिनेमा रिलीज होऊन 10 दिवस उलटले आहेत आणि येत्या काही दिवसात हा कमाईचा आकडा आणखीनंच उंचावण्याची शक्यता आहे. कश्मीरी पंडीतांवरील अत्याचाराची कहाणी या सिनेमात सांगण्यात आली आहे.