मुंबई :  कोविड काळात दोन गोड मुलांच्या गाण्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ऑस्ट्रेलियात राहाणारे हे चिमुकले मंजेश्वर ब्रदर्स या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचे बोबडे बोल यूजर्सना चांगलेच पसंतीस उतरले होते. मात्र आता सोशल मीडियावर अजून एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत मंजेश्वर ब्रदर्स आता मोठे झाल्याचं दिसत आहेत. मात्र हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोक ही मुलं एवढी मोठी कशी झाली? तर काही हा व्हिडीओ फेक असल्याचे बोलत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमागचं सत्य आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसणारी मुलं ही जरी मंजेश्वर ब्रदर्ससारखी दिसत असली तर ते मंजेश्वर ब्रदर्स नाहीत. हे दोन तरुण 'हौले हौले साजना' या गाण्यावर रील क्रिएट करताना दिसत आहेत. तरुणांची ही जोडी लिप सिंक करत असताना त्या छोट्या मुलांचा आवाज येत आहे. युवकांनी एक्सप्रेशन सुद्धा अगदी त्या लहानग्यांसारखेच दिले. हे तरुण जुडवा म्यूझिक नावाने प्रसिद्ध आहेत. इन्स्टाग्रामवर जुडवाम्युझिक असं त्यांचं युजर नेम आहे.


जुडवा म्युझिक या ब्रदर्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांना त्यांची ही शैली आवडली असली तरी अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं आहे. 


एका यूजरनं कमेंट करत लिहीलं आहे की, लोक किती फेमस होतात ना. दुसऱ्या च मजाक उडवून तर अजून एकाने लिहीलंय, त्या पोरांसारखेच दिसतात यार तुमी दोघ सेम. तर अजून एकाने लिहीलंय की, युरीया खाल्ला का? तर अजून एका यूजरने कमेंट करत लिहीलं की, काय खाल्लं रे ह्या बाळांनी... एवढे मोठे कसे काय झाले. तर अजून एकानं, हे मोठे झाले तरी यांचा आवाज बदलला नाही असे म्हटले. असे करतानाच अनेकांनी या तरुणांना ट्रोल केले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तर काहींनी मात्र त्यांचं कौतुकही केलं आहे. एकाने कौतुक करत म्हटलंय की, आई ग. तर अजून एकाने खूप छान असं म्हटलंय. तर अजून एकाने आम्हाला तुमची अजून गाणी ऐकायला आवडतील. 


व्हायरल होणारी मंजेश्वर ब्रदर्स ही मुलं कोण होती?
वास्तविक ही दोन्ही मुलं मंजेश्वर ब्रदर्स या नावाने प्रसिद्ध आहेत. ही दोन्ही मुलं महाराष्ट्रातील रहिवासी असून  लॉकडाऊनच्या काळात दोघांनीही यूट्यूबवर अनेक गाणी अपलोड केली होती, त्यांची गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती.